world heart day : हृदयरोग लक्षणे, उपचार

संपूर्ण जगभरात व भारतात हृदयरोगाने मृत्यू होणार्‍या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक आकडेवारीप्रमाणे भारतीय वंशाच्या व्यक्‍तींना इतरांपेक्षा 10 ते 15 वर्षे अगोदर हृदयरोग होतो. म्हणून भारत ही केवळ मधुमेहाची नसून हृदयरोग व संबंधित आजाराची राजधानी बनत चालली आहे. म्हणून मला काही होणार नाही, असे म्हणत बसून चालणार नाही.
झीर्शींशपींळेप ळी लशीींंशी ींहरप र्लीीश (ऋीराळपसहरा हशरीीं ीळीज्ञ डलेीश) जोखीम मूल्यांकनचा वापर करुन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ढोबळमानाने वर्तविता येते.यामध्ये आपले वय, स्त्रीत्व अथवा पुरूषत्व, अतिरक्तदाब, अनुवंशिकता, वजन प्रमाणापेक्षा वाढलेले असणे, व्यायामाचा अभाव, बैठे काम, ताणतणाव, चिंता, काळजी, नैराश्य, स्वैर आहार, रक्तातल्या साखरेचे प्रमाण अनियंत्रित असणे वरील सर्वांचा विचार करून (ऋीराळपसहरा हशरीीं ीळीज्ञ डलेीश) ची मोजमाप केली जाते.

प्रतिबंधात्मक उपाय :

व्यायाम : रोज नियमीतप्रमाणे व्यायाम केल्याने खात्रीशीरपणे हृदयरोग बचाव होऊ शकतो. कोणत्याही व्यायाम क्रीडाप्रकारामधून जर दर आठवड्याला 2500-9000 उष्णांक खर्च केले. तर त्या व्यायाम क्रीडाप्रकारामुळे हृदयरोगापासून सरंक्षण मिळेल, म्हणूनच व्यायाम हा जेवणासारखा रोजच्या दिनचर्याचा भाग असायला हवा. ते अपरिहार्य आहे.

धूम्रपान, तंबाखू : धूम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनाने शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात (जुळवरपीीं) तयार होतात व त्यामुळे धमण्या आतून कठीण होत जातात. तंबाखूमधील निकोटीन हा घटक सर्वात अपायकारक असून त्यामुळे हृदयरोगांची शक्यता वाढत जाते. धूम्रपान व तंबाखूच्या सेवनाने हृदयरोग होण्याची शक्यता दहापटीने वाढते. म्हणून कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचे सेवन टाळावे.

आहार : हृदयरोगाचा सामना करण्यासाठी संतुलित आहार कसा असावा, हे जाणून घेणे गरजेचे आहे. धान्य, तृणधान्य आणि पिष्ठमय पदार्थ आपल्या आहारात दिवसातून चार-पाच वेळा असणे गरजेचे आहे. साल न काढलेल्या धान्यांचा आपल्या आहारात जास्त समावेश असणे गरजेचे आहे.

प्रथिने : वनस्पतीजन्य आहारातून मिळणार्‍या प्रथिनामुळे शरीरातील चरबी व शरीरात तयार होणारे जुळवर्रीपीं कमी करण्यास मदत होते. डाळी, कडधान्ये याचा जास्त वापर करावा. मासे (आठवड्याला 400 ग्रॅम), चिकन (घरी केलेले व चरबी काढलेले), दूध (साय काढलेेले) व अंडी (आठवड्यातून तीन वेळा) घेऊ शकतो. पण हे प्राणीजन्य चरबी जमलेले पदार्थ, कोरडे भाजल्यास किंवा तळल्यास त्यातून षीशश ठरवळलश्रशी तयार होतात व हृदयरोगास निमंत्रण देतात. म्हणून जास्तीत जास्त वनस्पती प्रथिने आपल्या आहारामध्ये असावीत.

स्निग्ध पदार्थ : सर्वप्रथम आपण रोजच्या जेवणात किती तेल वापरतो, याचा विचार केला पाहिजे. सरासरी 500 मिली/ प्रतिमाणूस/ महिना एवढे प्रमाण योग्य मानले जाते. भौगोलिकदृष्ट्या आपआपल्या भागात पिकणार्‍या तेलबियांपासून मिळणारे आणि ज्यांची आपणाला लहानपणापासून सवय आहे तेच तेल वापरावे. म्हणून महाराष्ट्रात शेंगतेल, आणि बदल म्हणून करडई, सूर्यफूल आलटून-पालटून वापरावे.
फळे आणि भाज्या: टोमॅटो, गाजर, पालेभाज्या, केळी अशा अनेक रंगीबेरंगी भाज्यांचा आणि फळांचा समावेश आपल्या आहारात करावा. रोज पाच ते सात वाट्या भाजी आणि सिझनल फळे आहारात घ्यावी.

मीठ आणि साखर : बेकरी, पाकिटातले हवाबंद पदार्थ, खाण्यास तयार पदार्थ, पापड, लोणचे याचा अतिरेक टाळावा. साखरेच्या बदल्यात पावडर गूळ, खजूर खाऊ शकतो. रोजच्या जेवणात मीठ कमी घालणे आणि कृत्रिम व टिकाऊ म्हणून मीठ घातलेल्या पदार्थंचे सेवन कमी करणे.

मानसिक स्वास्थ : टाईप ए प्रकारचे व्यक्तिमत्व असणार्‍या व्यक्ती हृदयविकार व अतिरक्तदाबाला बळी पडताना दिसतात. चिंताग्रस्त व अतिसंवेदनशील लोकांमध्येसुध्दा हृदयरोगाचे प्रमाण जास्त असते. ह्रदयरोगाचे प्रमाण जास्त असते.

Happier people have healthier hearts म्हणून सकारात्मक मानसोपचार पध्दतीमुळे हृदयरोग टाळता येईल.

निदान व उपचार ः लक्षणे : जर हृदयविकार लवकर ओळखता आला, तरच रुग्णांचा जीव वाचवता येतो. म्हणून हृदयरोगाची लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे. लक्षणामध्ये मुख्यत छातीत दुखणे, दम लागणे, घाम येणे, चक्कर येणे याचा समावेश होतो. छातीच्या मध्यभागी दुखणे, ते चालल्यानंतर वा धावल्यानंंतर वाढणे व आराम केल्यानंतर कमी होणे,हेही हृदयरोग असणार्‍या लोकांची प्राथमिक लक्षणे असतात. हे दुखणे छातीच्या मध्यभागी सुरू होऊन डाव्या किंवा उजव्या हातापर्यंत जाते. प्रथमोपचार आणि निदान ः जर आपणास किंवा आपल्या आप्‍तस्वकियात अशी लक्षणे आढळून आली, तर वेळीच वेगवेगळ्या तपासण्या करून हृदयरोग ओळखता येतो. त्यामध्ये ECG, 2D, Echo, Tmt) d Coronary Angiography या तपासण्याचा समावेश होतो. उपचार : अत्याधुनिक Technology आजकाल हाताच्या नसेमधून Radial Angiography व Angioplasty चे ऑपरेशन काही मिनिटातच पार पाडता येतात. रुग्ण दुसर्‍या दिवसापासून सर्व कार्य करू शकतो. म्हणून वेळेत, रोगनिदान करणे जास्त गरजेचे आहे.